PM Vishwakarma Yojana या योजनेचा शुभारंभ 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते झाला आहे. या योजनेचा उद्देश कारागीर आणि शिल्पकार या लोकांचे मनोबल वाढवून त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन देणे आहे.

PM Vishwakarma Yojana/प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनाचे प्रमुख मुद्दे.
- PM Vishwakarma Yojana योजनेसाठी रु 13,000 हजार करोड बजेट मंजूर करण्यात आले आहे.
- प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना मध्ये 18 पारंपारिक व्यवसाययाची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये 140 हून अधिक जातींना याचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेच्या माधमातून शिल्पकार आणि कारागीर यांना त्यांच्या उध्योगानुसार प्रशिक्षण, प्रमाणपत्र आणि आयडी कार्ड देण्यात येणार आहे.
- PM Vishwakarma Yojana च्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाखापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 ते 3 लाखापर्यंत ची मदत 5% च्या व्याजावर मिळणार आहे.
- या योजनेमधून पात्र असलेल्या लोकांना कौशल विकास प्रशिक्षण, व्यवसायासंबंधित टूलकीट, डिजिटली व्यवहारासाठी मार्केटिंग सपोर्ट मिळणार अआहे.
PM Vishwakarma Yojana च्या माध्यमातून कोणा-कोणाला मिळणार लाभ.
PM Vishwakarma Yojana/ प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाच्या माधमातून एकूण 18 पारंपारिक व्यावसायिक समाविष्ट केले गेले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी खालील कामगार किंवा कारागीर असणे आवश्यक आहे.
| 1) चित्रकार | 7) हथोडा आणि अन्य साहित्य बनवणारे | 13) चटई, झाडू बनवणारे |
| 2) शिल्पकार | 8) सोनार | 14) पारंपारिक खेळणी बनवणारे. |
| 3) लोहार | 9) कुंभार | 15) वारिक/ केस कापणारे |
| 4) जहाज बांधणी कामगार | 10) टेलर / कपडे शिवन काम करणारे | 16) माळ विणणारे कारागीर |
| 5) अस्त्र बनवणारे कामगार | 11) चाम्बार | 17) धोबी |
| 6) कुलूप बनवणारे कामगार | 12) बांधकाम कामगार/ मिस्त्री | 18) माश्यांचे जाळ बनवणारे कारागीर |
Table of Contents
PM Vishwakarma Yojana Online Apply / प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी अर्जदारांचा नोंदणीवेळी त्यांचा व्यवसाय चालू असणे महत्वाचे आहे. अर्जदाराचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असायला पाहिजे. पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ( CSC ) मध्ये जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
CSC सेंटर मधून प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनाची ऑफिसियल वेबसाईट https:pmvishwakarma.gov.in या साईट वरून तुम्ही अर्ज करू शकता.
PM Vishwakarma Yojana required Documents/ अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्र.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र खालीलप्रमाणे आहेत.
- आधार कार्ड ( ओळख पत्र )
- लाईट बिल, राशन कार्ड, मतदान कार्ड या पैकी एक ( address proof )
- बँक पासबुक झेरॉक्स
- सध्याची कलर फोटोग्राफ
- तुम्ही करत असलेल्या कामाचे लायसन्स किंवा कामासंबंधित कागद
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी
हे सर्व कागदपत्र अपडेट असायला पाहिजे, सर्व कागदपत्र दिले तर तुमच्या अर्जामध्ये त्रुटी निघणार नाही.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मधून शासन देणार महिलांना आणि अपंग/दिव्यांग व्यक्तींना शिलाई मशीन.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून सरकारने पारंपारिक व्यवसाय आणि कारागिरांना पाठींबा देण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने मधुन शिलाई मशीन वर काम करणाऱ्या कारागिरांना आर्थिक मदत आणि शिलाई मशीन देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांना रोजंदारीचे साधन निर्माण होणार आहे. महिला आणि अपंग व्यक्ती यांना या योजनेतून मदत मिळणार आहे.
योजनेतून पात्र लाभार्थींना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. आर्थिक मदत म्हणून व्यवसाय करण्यासाठी 15,000 हजार रुपयापर्यंत चे अनुदान मिळणार आहे. शिलाई मशीन मिळाल्यानंतर शिलाई काम करण्यासाठी मोफत प्रशिक्षण (5-15 दिवस) दिले जाणार आहे. आपला स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी या योजनेतून कमी व्याजदराने 2 ते 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे.
PM Vishwakarma Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.लाभार्थ्याचे वय 18 ते 50 वर्ष असणे आवश्यक आहे. लाभार्थी पारंपारिक व्यवसायामध्ये (शिलाई,हातकाम ) गुंतलेला पाहिजे. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. PM Vishwakarma Yojana अंतर्गत शिलाई मशीनची योजना फक्त महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आहे.
visit : http://www.angadgawale.in
शिलाई मशीन साठी अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्र
- आधार कार्ड
- पत्ता पुरावा ( राशन कार्ड वीज बिल )
- बँक खात्याचे झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अपंग प्रमाणपत्र/दिव्यांग
आपल्या जवळच्या CSC सेंटर वर जाऊन भरावा लागेल, तुम्ही तुमचा अर्ज स्वतः जाऊन भरावा लागेल कारण अर्ज भरण्यासाठी अर्जदाराचा अंगठ्याचा ठसा लागणार असतो. अर्ज सादर केल्या नंतर शिलाई मशीन साठी लाभार्थ्यांची पात्रता तपासून लाभ दिला जातो

PM Vishwakarma Yojana मध्ये कोण अर्ज करू शकतो ?
पारंपारिक शिल्पकार आणि कारागीर या योजने साठी अर्ज करू शकतात. ज्यामध्ये 140 हून अधिक जाती चे उमेदवार पात्र असणार आहेत.
PM Vishwakarma Yojana मधून लोन घेण्यासाठी काय करावे ?
CSC सेंटर मध्ये जाऊन PM Vishwakarma Yojana ऑफिसीयल पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल.
PM Vishwakarma Yojana मध्ये किती रुपये मिळतात.
पारंपारिक शिल्पकार आणि कारागीर यांना दोन किश्त मध्ये 3 लाख रुपयांचं लोन 5% व्याजदरावर मिळणार आहे. यामध्ये भारत सरकार 8% पर्यंत व्याज माफ करणार आहे.